ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

नवरात्रीचे नवरंग

नवरात्र म्हणजे सळसळता उत्सव , घटस्थापना, देवीच्या देवाळातल्या लांबच लांब रांगा, उपवास, वाढीव किंमतीतली फळं, झेंडूच्या फुलांच्या राशी, गरबा आणि दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक ... एकुणच काय तर नऊ दिवस धमाल... याबरोबरच एक नविन समीकरण रुजू पहातयं, नव्हे ते रुजलयं - 'नवरंग - नऊ रंग, घत्स्थापनेच्या तीन-चार दिवस आधिपासुन 'मटा' मध्ये हे नऊ दिवसांचे नऊ रंग छापून येतात... आणि मग घराघरात त्या रंगांप्रमाणे साडया/ड्रेस काढून ठेवले जातात... लेडीज स्पेशल जेव्हा प्लॅटफॉर्म वर तेव्हा ही एकाच रंगाची उधळण पहावी... यात आता पुरुषही मागे राहिलेले नाहीत... त्या त्या दिवशी त्या त्या रंगांचे मिळतेजुळते शर्ट घालून ऑफिसला जातात...
ऑफिस, सोसायटी, महिला मंडळ एकत्र ग्रुप करुन फोटो काढतात आणि काही निवडक फोटो मटा मध्ये छापूनही येतात... परवा एक मैत्रिण भेटली, बोलता बोलता तिने पर्संमधून मटा काढला, म्हणाली ' बघ आमच्या ऑफिस ग्रुपचा फोटो छापून आलाय'... १६ जणींच्या ग्रुप मध्ये मागच्या रांगेत शेवटून तीसरी... खरतर घरी मी फोटोवर नजर मारली होती पण इतक निरखून पहिला नव्हत त्यामुळे ओळ्खू शकले नाही.... पुढे म्हणाली ' मी पण फोटो पाहिला नव्हता, सकाळपासुन दहा फ़ोन आले तुमचा फोटो पेपर मध्ये छापून आलाय ते सांगायला आणि ते दहाही फ़ोन पुरुषांचे होते, एकही बाईचा नव्हता' ... म्हणजे बघा, सकाळी हातात पेपर घेउन बसणारी पुरूषमंडळी काय उद्योग करत असतात ते... फोटोतल्या प्रत्येक बघणं म्हणजे खरचं कमाल आहे पुरुषांची .... एकूण काय 'मटा'ने नटून मिरवण्याची थीम दिली आणि पुरुषांना नेत्रसुख..

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

चारोळी

नमस्कार आजपासून ब्लॉग लिहायला सुरुवात करतेय
स्वानुभव, घटना, आवडलेल्या कविता, किस्से असं काहीबाही लिहायचा मनोदय आहे
आज एक आवडलेली चारोळी लिहितेय (माझी नाही हं ) ......

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत नवी दिशा असावी
घरटयाचे काय, बांधता येइल केव्हाही
क्षितिजा पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी ............