ब्लॉगवर आपले स्वागत आहे

बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

मुंबई सुरक्षित आहे का?

शुक्रवार दिनांक १३.११.२००९ रोजी संध्याकाळी साधारण ७.४५ च्या सुमारास मी खारवेस्ट वरून ऑटो पकडली कुर्ला वेस्ट साठी..... खरतर मला कुर्ला ईस्टला जायच होत .... पण ऑटोवाला म्हणाला कुर्ला वेस्ट जाऊंगा.... बैठना है तो बैठो.... मी बसले ... मनात म्हटल कुर्ला वेस्ट तर कुर्ला वेस्ट ..... ऑटो हातची जाऊ द्यायची नव्हती ...... ऑटोने 'बीकेसी'त एंट्री घेतली ... पोलिसांची नाकाबंदी होती नेहमीची.... पुढे गेलो.... लेफ्ट साईडला असलेल्या बीकेसी पोलिसस्टेशनवर नजर पडली ...... इमारतीला काचा असलेला पोलिसस्टेशन.... बाहेरून आतलं सगळ दिसत होत... पॉश एरियाप्रमाणे पॉश पोलिसस्टेशन असा विचार करत पुढे निघाले... बाजुलाच असलेला पेट्रोल पंप क्रॉस केला... सिग्नल क्रॉस केला .... ऑटो पुढे गेली... इतक्यात .... एक बाइक ऑटोच्या राइट साईडला अगदी बाजूला आली..... जवळ जवळ चिकटून.... बाइकवर दोघजण होते.... मला काहीसुचायच्या आतच पाठी बसलेल्या मुलाने ऑटोत हात घालून माझी पर्स खेचून घेतली... आणि लगेच बाइक बाजूला झाली ....मी ओरडायला लागले.... जितक्या शिताफीने त्याने पर्स उचलली तितक्याच शिताफीने तीच पर्स बाइकच्या नम्बरप्लेटवर धरली... मी नम्बर सुद्धा पाहू शकले नाही.... बाइकने स्पीड घेतला .... ऑटोवाल्याने स्पीड वाढवून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाइकच्या स्पीड पुढे ऑटोचा काय निभाव लागणार ..... मी ऑटोवाल्याला यु टर्न घ्यायला सांगितला.... ऑटो बीकेसी पोलिस स्टेशनला आणली... आधी पोलिसस्टेशन पाहिल होत तेव्हा कल्पनाही नव्हती की काही मिनिटातच आपल्याला आत जाव लागणार आहे.... आत गेले ..... समोर एका टेबलवर काही हवालदार बसले होते त्याना सांगितल... त्यानी दुसऱ्या एका टेबलवर बसलेल्या हवालादाराकडे जा सांगितल..... तिकडे गेले तर हे हवालदारसाहेब अजुन एक दोन हवालदारसोबत काही रिव्होल्वरच्या नोंदी करत बसले होते..... मला बसायला सांगितल..... अगदी सुवाच्य अक्षरात नोंदी करून झाल्यावर हवालदारसाहेब फ्री झाले..... मग मी पुन्हा काय घडल ते रिपीट केला..... सगळ ऐकल्यावर म्हणाले 'पीएसआय ' साहेब आतमध्ये मोठ्या साहेबांकडे आहेत.... येतील आता लगेच बाहेर..... त्याना सांगा..... यात किती वेळ गेला असेल विचार करा ..... साहेबांची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता ..... १० /१५ मिनिटांनी साहेब आले .... पुन्हा कैसेट रिपीट केलि...... पर्समध्ये काय काय आहे विचारून घेतल....... रु ३५०० रोख, क्रेडिट कार्ड, 'पेनकार्ड, वाहनचालक परवाना, रेलवेपास, इतर काही मौल्यवान ऐवज आणि ऑफिसचे महत्वाचे काही पेपर होते.... साहेबांनी दोन तिन सिव्हिल ड्रेसमधले हवालदार आणि गाड़ी दिली व पूर्ण एरियात फेरी मारून यायला सांगितले..... आता इतक्या वेळानंतर ते चोर तिथे थांबले असतील का? पण काय करणार..... गेलो.... एक एरियात राउण्डमारून परत आलो ....... मग माझ्या समोर दोन रजिस्टर ठेवली .... आरोपींचे फोटो असलेली .... ओळखा...... काही क्षणातच घडलेली घटना आणि शिवाय अंधार .... चेहरा नीट पाहता आला नाही ...... फोटो नाही ओलखता आला .... बाइकचा नम्बर पाहीला का ? नाही .... पर्स धरली होती...... किती वेळा तेच तेच सांगायचा..... बाइक कोणत्या मेकची होती? मेक पहायला वेळच कुठे होता.... साहेब म्हणाले ' मी जे जे कागदपत्र हरवले त्याचे सर्टिफिकेट देतो, दुसरे बनवून घ्या... पर्स आम्हाला मिळाली, कोणी आणून दिली की तुम्हाला फ़ोन करतो, तुम्हाला काही विचारायचा असेल तर केव्हाही फ़ोन करा' तुम्ही बाइकचा नम्बर पाहिलेला नाही, आरोपींचा वर्णन सांगता येत नाहीये, १०० वेळा पोलिसस्टेशनला खेटे घालावे लागतील, कंप्लेंट नाही पण सर्टिफिकेट देतो, तुमच काम होइल, मी तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्ही आम्हाला सहकार्य करा'.... असा म्हणून ते सर्टिफिकेट देऊन माझी रात्रि १०.३० वाजता पाठवणी केलि..... आजमितिस काही पर्स मिळालेली नाही....... अजुनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नाही..... एकट्याने ऑटो मध्ये बसायची पण भीती वाटते ......

शनिवारच्याच टाइम्स मध्ये अशीच घटना ३.११.२००९ बांद्रा वेस्टला घडल्याची बातमी होती.... शोपिंगला जाणार्या दोघी ऑटोवाल्याला भाड़ देत होत्या तेव्हा बाइकवरून दोघानी त्यांची पर्स चोरली.... पुढे पेट्रोल पंप वर त्या चोरानी चोरलेल्या क्रेडिटकार्डचा वापर करून पेट्रोल पण भरलं.... पोलिसाना बाइकचा नम्बर पण मिळाला... पण अजुन काही तपास लागलेला नाही..... रोजच्या पेपरमध्ये अशा बातम्या येत असतात..... जितके गुन्हे घडतात त्याच्या १% पण पेपरमध्ये छापून येत नसतील..... मोर्निंगवॉकला जाणार्या किती स्त्रियांची मंगलसुत्रे चोरीला जातात ...... काय सुरक्षा राहिली आहे मुंबईत ..... आणि पोलिस जर असेच दुर्लक्ष करत राहिले तर पुढे मुंबईची काय परिस्थिति होइल विचार करा ..... रस्त्यावरून चालण्याची सोयही राहणार नाही......

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९

ती सासू होती म्हणुन?

दुपारचा साधारण एक वाजला असेल.... केबिनच दार उघडून माझी एक सहकारी आत आली .... म्हणाली '' घरून फ़ोन आला, माझी सासु आताच वारली, मी निघते'' .... थोडी चौकशी केली, आजारी होती का वगैरे आणि मी तिला 'लगेच निघ' म्हटल.... अर्ध्या तासाने मी केबिनच्या बाहेर आले.... लंचटेबलवर एक नजर टाकली तर ही बाई नेहमीप्रमाणे लंच ग्रुपबरोबर जेवत बसलेली दिसली... मला धक्काच बसला.... व्यवस्थित डबा संपवून ती ऑफिसमधून निघाली... माझ्या मनात अनेक विचार येत राहिले ...... ' घरातील कोणतीही व्यक्ति गेल्याची बातमी ऐकल्यावर एकतरी घास घश्याखाली उतरु शकतो का? कितीही वयस्कर असुदे, आपले कितीही वाद असुदे, पण ती एक घरातली व्यक्तिच होती ना? सासूच्या जागी आई असती तर ती अशीच वागली असती का? ..... असे अनेक प्रश्न ..... अर्थात यातला एकही मी तिला तेव्हा किंवा नंतर कधी विचारला नाही.... पण तिचं वागणं मनाला खटकलं.....

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

जपून चाल रे जीवा

आयुष्यात आपण अनेक माणसांना भेटत असतो.... काही लक्षात राहतात, काही नाही.... तसेच आपल्यालाही कोणी लक्षात ठेवत असेल कोणी नाही.... बरेचदा इतरांशी वागताना खुप बेफिकिरेने वागला जात... कधी आपल्या कळत , कधी नकळत..... प्रत्येक जण एकमेकाच निरिक्षण करत असतो आणि बऱ्याच गोष्टी टिपत असतो ... त्यावरून चांगल वाईट मत ही बनवत असतो .... वागण्या - बोलण्यात सतर्कता ही नेहमीच आवश्यक असते.... हे सगळ लिहिण्याच कारण म्हणजे गेल्या आठवड्यात जुन्या ऑफिस मध्ये जाण्याचा योग आला.... ऑफिस मध्ये गप्पा चालल्या होत्या.... तेवढ्यात एक इन्दोरवरून कस्टमर आला.... सगळ्याना हाय हँलो करत माझ्याकडे वळला आणि म्हणाला "नमस्कार, आप सारिकादिदी है ना? मैं १९९७ में आपके ऑफिसमें पहेली बार आया था तब आपसेहि मुलाकात हुई थी। उस वक्त आपके हाथका लिखा हुआ पेपर आजभी मैंने संभालके रखा है। उसवक्त मेरे बिज़नस की शुरुवात थी और आपने काफी सपोर्ट किया था। आणि मग इतर बिज़नसविषयी गप्पा सुरु झाल्या... असाच काल एका जुन्या सहकारयाचा फ़ोन आला होता .... म्हणाला " आपने मुझे एक डिक्शनेरी और पेन गिफ्ट दिया था। आपको शायद याद ना हो पर मैंने अभीतक संभलके रखा है। " सांगायचा मुद्दा हा की ह्या दोन्ही व्यक्तिनी चांगल्या आठवणी जपून ठेवल्या.... त्यांचा स्वभाव चांगल ते जतन करण्याचा असावा ..... अशाही व्यक्ति असतील ज्यांनी वाईट प्रसंग मनात ठेवले असतील..... जपून चाल रे जीवा ... आसपासची माणस तुझ्या वागण्याच निरिक्षण करत असतात आणि परिक्षण पण ... जबाबदारी वाढली आहे .... तेव्हा जपून ...



मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

वाढदिवस

सखी, तुझा आज वाढदिवस

दिवस हा सोन्याचा खास

धरिलेस नाही जरी हे उरी

तरी पहिल्याइतकीच दुसरीही ओळ खरी

जवळच्यानीँ जरी दिले दुखः

तरी तू मात्र नेहमीच दिलेस सूख

प्रत्येक प्रसंगाला गेलीस सामोरी

संकटाला तू कधीच न पाठमोरी

तुझी जिद्द, तुझी बुद्धिमत्ता अपार
परिश्रमांच्या जोडीने केलास यशाचा टप्पा पार

प्रत्येक क्षणी केलास सारासार विचार

कर्तव्य आणि जबाबदारया पाडल्यास पार

हसरा चेहरा, बोलकी नजर
त्यात पडली लांब केसांची भर
तुझ्या गुणसोंदार्याची दुनियेला ख़बर
तू मात्र अगदीच बेखबर

लाभों तुला उदंड यश अन कीर्ति
तुझ्या प्रत्येक स्वप्नांची होवो पूर्ति
शुभेच्छांचे बांधून तोरण
आज केले मानसऔक्षण

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

गरीबाचा वाली कोण?

ऑफिस बिल्डिंगचा वाँचमन कपाळाला सकाळी सकाळी हात लावून बसला होता ..... विचारलं काय झाल बाबा, कोणाशी भांडलास?... त्याने घडलेली घटना सांगायला सुरवात केली..... काल सकाळी पगार घेतला, सगळ्या पाचाशेच्या नोटा.... फॅमिली गावी असते..... वडिल आजारी आहेत..... त्यांच्या अकाउंट मध्ये रुपये पाच हजार भरायला बँकेत गेलो ...... तिथल्या कँशियरने ४५०० फ़क्त जमा करून घेतले आणि एक पाचशेची नोट खोटी आहे म्हणाला..... मी विनंती केली मला नोट परत द्या... माझ्या पगाराचे पैसे आहेत ..... मी साहेबांना नोट परत देतो आणि दूसरी घेतो ..... कँशियर काही ऐकायला तयार होइना .... त्याला मी अनेक प्रकारे विनंती केली की नोट फाडून द्या किंवा नोटेवर काट मारून द्या पण तो तयारच होइना ..... मी साहेबांना पटवून कसा देणार? शेवटी तो मला घेउन मँनेजर कड़े गेला ..... त्या साहेबांची पण मी खुप विनवणी केली .... त्यांनी स्पष्ट सांगितल, तुझ्या साहेबाला घेउन ये इथे ...... नोट मिळणार नाही .... त्या नोटेची एक झेरोक्स देतो ...... झेरोक्स घेउन आलो परत ऑफिसला ..... साहेबांना भेटलो, सांगितल सगळं..... पण साहेब एकेनात..... ते म्हणतात मीच नोट दिली कशावरून? तू बदलली असशील तर? नोट परत घेउन ये, मी बदलून देतो, बैंक नोट फाडून देते परत, तू खोट बोलतोस.... साहेबानी हात झटकले... मी काय करू , माझे पाचशे रुपये गेले हो.... महिनाभर राबुन पगार घेतला, कोण कुठले लोक खोट्या नोटा बनवत असतील, पण मला गरिबाला फोडणी लागली .... वाँचमनने रडायला सुरुवात केली.... मी तरी काय करू शकणार होते . फ़क्त दुखःत सहभागी .......

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

निवडणुकितला रोजगार

काल टिव्ही वर बातम्यात पाहिलं ... प्रचारसभेत, रैलीमध्ये, प्रचार फेरीत सहभाग घेउन घोषणा देण्यासाठी प्रत्येकी रुपये २५० देऊन माणसे भाड्याने आणली जातात.... पैशांबरोबर दोन वेळचा जेवण आणि नाश्ता दिला जातो ..... माणसे भाड्याने पुरावणारे दलाल आहेत ..... पक्ष कोणताही असो , सांगितलेल्या घोषणा देणे इतकच काम..... ह्यावर माणसांना दहा दिवस रोजगार मिळतो म्हणुन समाधान मानाव की आपण कुठच्या पातळीवर जातोय हे पाहून दुखः कराव हेच कळेना.... पूर्वी एका पिक्चर मधे पाहिलं होत, घरात मृत्यु झाल्यावर माणसं बोलवायचे - रडायला, शोक करायला ... हा तसाच प्रकार झाला...... आणि हे चित्र प्रत्येक पक्षात सारखच आहे ... आज आमचाकडे आमचे समर्थक कार्यकर्ते नाहीत... अशी परिस्थिति का निर्माण झाली?

निवडणूकिच्या आधीच फ़क्त जनसंपर्कात रहाण्याची गरज या नेत्याना का वाटते? निवडणूक संपली की ही मंडळी गायब होतात ती परत पाच वर्षानी दिसतात..... निवडून आल्यावर तुम्ही आपापल्या मतदारसंघात काम का करत नाही.... your work will speak..... पाच वर्ष काम करा , तुम्हाला मत मागण्याची पण गरज नाही... तुम्ही नक्की पुन्हा निवडून येणार .... पण एकदा का आम्ही निवडून गेलो की परत मतदारसंघात वळून कोण बघतय? काम करणं तर लांबच राहिलं....

उमेदवार पण असे उभे करतात की ज्यांची नाव पण आधी एकलेली नसतात.... अशा लोकांना निवडून द्यायच? मतदान करताना एकही लायक उमेदवार नाही हे मत नोंदवण्याची सोय आता आमचा हातात असायला हवा... त्याशिवाय ही राजकारणी मंडळी सुधारणार नाहीत आणि काम केल्याशिवाय पुन्हा निवडून येता येणार नाही ह्याच भान ठेवाव लागेल .....

मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

घन तमी शुक्र बघ राज्य करी

काल ग्रन्थ घेउन महिषासुरमर्दिनीचं एक आख्यान वाचत होते .... वाचताना एक उल्लेख आला... घनदाट निबिड़ अशा तम्रतामस नावाच्या अरण्यात अंधाराचे उपासक शुक्राचार्य उपासना करीत असत.... आता शहाण्यासारखं पुढे वाचत राहाव की नाही? पण आमचं मन म्हणजे डूरक्या (वळू मधला ... आठवला?) ... एक जागेवर स्थिर रहाणार नाही.... याला वेसण घालून मुसक्या बांधून कसं ठेवाव तेच कळत नाही ... जाउदे... मी लगेच लागले गाणं शोधायला .... हे शब्द कुठच्या तरी गाण्यात आहेत .... आठवेना ..... मग बऱ्याच वेळाने आठवलं.... घन तमी ... नेट गाठला .... पूर्ण गाण मिळवलं... इथेपण मनाला फटके .... आनंद झाला .... रचना - भा रा ताम्बे, संगीत - हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर - लता मंगेशकर .... पुढे काय बोलावे ......

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

ये बाहेरी अंडे फ़ोडूनी
शुद्ध मोकल्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्ण अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काटयांत बघ कसे
काळया ढगी बघ तेज रसरसे
तीव्र हिमातुनी वसंतही हसे
रे , उघड नयन, कळ पळे दुरी

फुल गळे, फळ गोड झाले
बीज नुरे डौलात तरु डोले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरी - करुणा
आई पाहे वाट रे मना
पसरुनी बाहू कवळण्या उरी