शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९
अपराध माझा
काल माझ्याकडून एक मोठी चुक झाली... ज्यासाठी मी स्वतःला कधीच माफ़ करू शकत नाहि... माझ्या सख्या जिवलग मैत्रिणीला माझी गरज असताना मी शक्य असतानाही उपस्थित राहिले नाहि... केवळ व्यर्थ विचारांमुळे... प्रसंगाच गाम्भीर्य ओळखू शकले नाही.... आणि एक चुकिचाच निर्णय घेतला.... याचवेळी चुकीचा निर्णय घेतला की अनेकदा चुकिचेच निर्णय घेतले जातात, कळत नाही... स्वतःच्या निर्णय क्षमतेवरचा विश्वासच उडालाय.... आयुष्यात आतापर्यंत घेतलेले अनेक निर्णय हे आता मागे वळून पहाताना चुकिचेच वाटतात... नेहमी मनात आपण कोणाला दुखवू नये , आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असाच प्रयत्न असतो, पण घडत नेमक उलटचं.... अनावधानानेही चुका का व्हाव्यात ... लक्ष कुठे असतं.... मी कोणाची मैत्रिण होण्याच्या लायक तरी आहे का? .... किंबहुना कोणत्याच नात्याच्या लायक आहे का? विचारांची परिपक्वता कधी येणार? असे अनेक प्रश्न आज मनात थैमान घालताहेत.... कालचा प्रसंग नाहि विसरु शकत कधी आणि ही सल कायम मनात राहिल अगदी मरेपर्यंत...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
it happens
उत्तर द्याहटवाती आपली सख्खी मैत्रिण असेल तर तिने केव्हाच माफही केले असेल... :-)
उत्तर द्याहटवाइतकं वाईट वाटुन घ्यायची काही गरज नाही. असं होतं.. कधी तरी.
उत्तर द्याहटवाThanks Harekrishnaji, Drushti & Mahendraji... Yes.. it happens and it hurts a lot too...Ti kharach khup sakkhi maitrin aahe.. tila maaf karayla kshanhi lagat nahi... she is great...
उत्तर द्याहटवा