ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

निवडणुकितला रोजगार

काल टिव्ही वर बातम्यात पाहिलं ... प्रचारसभेत, रैलीमध्ये, प्रचार फेरीत सहभाग घेउन घोषणा देण्यासाठी प्रत्येकी रुपये २५० देऊन माणसे भाड्याने आणली जातात.... पैशांबरोबर दोन वेळचा जेवण आणि नाश्ता दिला जातो ..... माणसे भाड्याने पुरावणारे दलाल आहेत ..... पक्ष कोणताही असो , सांगितलेल्या घोषणा देणे इतकच काम..... ह्यावर माणसांना दहा दिवस रोजगार मिळतो म्हणुन समाधान मानाव की आपण कुठच्या पातळीवर जातोय हे पाहून दुखः कराव हेच कळेना.... पूर्वी एका पिक्चर मधे पाहिलं होत, घरात मृत्यु झाल्यावर माणसं बोलवायचे - रडायला, शोक करायला ... हा तसाच प्रकार झाला...... आणि हे चित्र प्रत्येक पक्षात सारखच आहे ... आज आमचाकडे आमचे समर्थक कार्यकर्ते नाहीत... अशी परिस्थिति का निर्माण झाली?

निवडणूकिच्या आधीच फ़क्त जनसंपर्कात रहाण्याची गरज या नेत्याना का वाटते? निवडणूक संपली की ही मंडळी गायब होतात ती परत पाच वर्षानी दिसतात..... निवडून आल्यावर तुम्ही आपापल्या मतदारसंघात काम का करत नाही.... your work will speak..... पाच वर्ष काम करा , तुम्हाला मत मागण्याची पण गरज नाही... तुम्ही नक्की पुन्हा निवडून येणार .... पण एकदा का आम्ही निवडून गेलो की परत मतदारसंघात वळून कोण बघतय? काम करणं तर लांबच राहिलं....

उमेदवार पण असे उभे करतात की ज्यांची नाव पण आधी एकलेली नसतात.... अशा लोकांना निवडून द्यायच? मतदान करताना एकही लायक उमेदवार नाही हे मत नोंदवण्याची सोय आता आमचा हातात असायला हवा... त्याशिवाय ही राजकारणी मंडळी सुधारणार नाहीत आणि काम केल्याशिवाय पुन्हा निवडून येता येणार नाही ह्याच भान ठेवाव लागेल .....

1 टिप्पणी:

  1. मतदान करताना एकही उमेदवार लायक नाही असे तुम्ही सांगू शकता.
    अशी सोय उपलब्ध आहे.
    त्या साठी तुम्हाला मतदान केंद्रात जाव लागत. तेथे जाऊन फ़ॉर्म भरवा लागतो. तुमच मत मोजल जात पण ते कोणत्याही उमेदवाराला जात नाही.


    अनिकेत वैद्य.

    उत्तर द्याहटवा