ब्लॉगवर आपले स्वागत आहे

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

फितूरी

तुजसाठी केला लढा, तुलाच किंमत उरली नाहि
केलेल्या संर्घषाला आता अर्थच उरला नाहि

ठेवलीस न तमा आटवलेल्या रक्ताची
ऐनवेळी समरांगणी पाडलेस तोंडघशी

थुंकलेस तु चेहर्यावर उलटे परतुनी
अपमानीलेस वारंवार हासुनि खिजवुनी

उतरले झेंडे, म्यान झाल्या तलवारी
जाहल्या जखमा कायम खोलवरी

मानवा, कर जल्लोश क्षणैक विजयाचा
होइल पश्चाताप परी तुजला फितुरीचा

४ टिप्पण्या:

  1. कविता सुंदर आहे. एक बदल सुचवावासा वाटतो - केलेल्या संर्घषाला अर्थच आता उरला नाहि या मधे केलेल्या संर्घषाला आता अर्थच उरला नाहि असं वाचताना जास्त कम्फर्टेबल वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  2. मानवा, कर जल्लोश क्षणैक विजयाचा
    होइल पश्चाताप परी तुजला फितुरीचा ....... सहीये.

    उत्तर द्याहटवा