चुका करायच्या, पुन्हा पुन्हा करायच्या
माहित असल्या तरी कधीच नाही स्वीकारायच्या
कुणी दाखवून दिल्या तर दखल नाही घ्यायची
माफी मागायची तर गोष्टच राहिली दूरची
काहीच न झाल्यासारखं वागायचं
गावभर दात विचकत फिरायचं
अशा लोकांशी आहे माझं जन्माच वैर
मला नाही वाटत माझी भूमिका आहे गैर