ब्लॉगवर आपले स्वागत आहे

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

झू झू - आता वाजले की बारा

जाहिरात क्षेत्रातील क्रिएटीव्हिटीला दाद द्यावी तितकी थोडीच आहे... अनेकदा मूळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच जास्त मनोरंजक असतात ..... पूर्वी लहानपणी एखादा कार्यक्रम पहाताना मध्ये जाहिरात लागली की व्यत्यत आल्या सारख वाटायच कारण पूर्वी कार्यक्रमच दर्जेदार असायचे .... पण आता काही जाहिराती दर्जेदार असतात ..... वोडाफोनच्या 'झू झू ' च्या जाहिराती अशाच आनंद देणार्या आहेत .... हे 'झू झू' आणि त्यांच्या जाहिराती मला जाम आवडतात ... (माझ्या डेस्कटॉपवर, प्रोफाइलवर तुम्हाला झू झू सापडेल :) ).... हल्ली नुकतीच मैत्रिणीने तिच्या सेल वर एक विडियो क्लिप दाखवली .... मस्त आहे .... बघा तुम्हालाही आवडेल ..... आवडली तर जरुर सांगा

६ टिप्पण्या:

 1. तुम्ही म्हणताय ते खरे आहे. पण काही काही जाहिरातीत नक्की जाहिरात कशाची हे देखील समजत नाही. ईंडिया सिमेंटच्या एका जाहिरातील बिकिनी घातलेली अर्धनग्न नवयौवना तिचे लावण्य दाखवत समुद्रातून चालत येते.

  याचा सिमेंट कंपनीशी संबंध काय? हे आम्हाला अजूनही कळलेले नाही.

  आपला,
  (अडाणी) धोंडोपंत

  उत्तर द्याहटवा
 2. एकदम झक्कास.... खुपच आवडली. धन्यवाद, सारिका.

  उत्तर द्याहटवा
 3. पंत,
  प्रतिक्रियेबद्द्ल आभार.
  आपण म्हणताय ते अगदी खर आहे. काहि जाहिराती बघण्यासारख्या नसतात आणि मुळ प्रॉडक्ट्शी त्यांची सांगड हि घालता येत नाहि.
  ज्या चांगल्या जाहिराती आहेत त्यांच कौतुक करायला आणि
  आनंद घ्यायला काय हरकत आहे. चांगल आणि वाईट दोन्ही उपलब्ध आहे,आपण कशातुन आनंद घ्यायचा हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबुन आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. धन्यवाद दिलीपजी. मला ओरिजिनल डान्सपेक्षा हा जास्त आवडला. जाम मजा आली.

  उत्तर द्याहटवा
 5. त्या जाहीरातीचा उद्देश आपले लक्ष वेधुन घेणे होता, आणि बाकी सिमेंटच्या जाहीराती पेक्षा ती जाहीरात अधिक लोकप्रिय आणि लक्षात राहिलेली आहे.. भलेही लोकांनी त्याला शिव्या घातल्या आहेत.

  उत्तर द्याहटवा
 6. एकुण काय तर सिमेंट कंपनीचा अपेक्षित हेतु साध्य झाला

  उत्तर द्याहटवा