ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, १४ मे, २०१०

संधीच सोनं

आज कॉलेजमध्ये अगदि लगबग सुरु होती. झाडुन १००% उपस्थिती होती विद्यार्थ्यांची आणि
प्राध्यापक मंडळींचीही. एमबीए मार्केटिंगची अख्खी बॅच हॉलमध्ये पुढच्या जागा अडवुन
बसली होती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. ख्यातनाम मार्केटिंग गुरु मोहन देसाई
स्पेशल लेक्चर देणार होते. तब्बल एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर मोहन देसाईंची वेळ मिळवण्यात
कॉलेज व्यवस्थापनाला यश आल होत. मानधनही जबरदस्त मोजलं होतं तेही आगाउ.

मोहन देसाई व्यक्तिमत्वच असं होतं. अनेक रेप्युटेड कंपनीमध्ये त्यांना कन्सल्टंट म्हणुन
नियुक्त केलेल होतं. त्यांच नाव आपल्या कंपनीशी जोडल जाण ही एक सन्मानाची बाब
होती. कॉर्पोरेट जगतात त्यांचा दबदबा होता. अनेक सेमिनार मध्ये त्यांना जावं लागायच.
त्यांनी लिहिलेल पुस्तक सिलॅबसमध्ये होत आणि इतर अनेक पुस्तक हॉट सेलिंग रेंज
मधली होती. महिन्यातले पंधरा दिवस ते परदेशातच असायचे. चारीबाजुंनी पैसाच पैसा,
परदेशात घर,मूंबईत सीफेसिंग फ्लॅट, चार चार गाड्या, जोडीला मानसन्मान आणि आदर.
कन्सल्टन्सीबरोबरच लेक्चर देणे/शिकवणे त्यांना आवडायच आणि केवळ म्हणुनच
सकाळी अमेरिकेतुन भारतात परत आल्यावरदेखिल या कॉलेजमध्ये येण्यासाठी ते निघाले
होते.

मर्सिडिज कॉलेजच्या आवारात शिरली, देसाईसर उतरले. स्वागत, सत्कार झाले. मोहन देसाई
स्पीच द्यायला उभे राहिले. विषयात हातखंडा, अनेक उदाहरण देत, सगळ्यांना गमती-जमती
सांगत मार्केटिंगचे एक एक फंडे ओघवत्या भाषेत सर मांडत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन
ऎकत होते. तीन तास नॉनस्टॉप कसे गेले कळलेच नाही कोणाला. सर शेवटच्या मुद्दा मांडत
होते - वेल, प्रत्येक संधीच सोन करणं आणि यशस्वी होणं हे आपल्या हातात असतं.
परिस्थिती प्रतीकुल असेल तर ती आपल्याला हवी तशी चेंज करायची आणि ती चेंज करणं
शक्य नसेल तर स्वतःला चेंज करायच पण नेहमी प्रत्येकाने यशस्वीच व्हायच. ह्याच एक
उदाहरण देतो. २५ वर्षांपुर्वीची सत्यघटना आहे.एकदा एका मोठया चप्पल कंपनीने दोन
सेल्समन नियुक्त केले. दोघांना एका लांबच्या गावी जाउन सेल करण्याची पहिली असाइनमेंट
दिली. दोघही एकाच ट्रेनने निघाले होते, वेगवेगळ्या डब्यात होते आणि एकमेकांना ओळखतहि
नव्हते. दोघ ते स्टेशन येताच उतरले. गावात शिरताच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि
या गावात कोणी चप्पलच वापरत नाही. पहिली पोस्टिंग ती पण या गावात..आता काय
कराव? पहिल्या सेल्समनने विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे काहि सेल होणार नाही. मी पुढच्या
ट्रेन ने परत येतोय. आणि तो स्टेशनच्या दिशेने परत निघाला रिर्ट्न तिकिट बुक करायला.
द्सर्या सेल्समनने पण विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे खुप स्कोप आहे. एक काम करा
आपल्या स्टॉकमध्ये जितका माल असेल तो सगळा इथे पाठवुन द्या. मी सगळा विकतो.
आणि तो बोलला तसं त्याने केलं. आज तो त्याच नामवंत कंपनी मध्ये मार्केटिंग हेड आहे
आणि फॅट सॅलरी घेतोय. सो फ्रेन्डस, दॅटस इट, IF YOU CANT CHANGE THE
SITUATION, CHANGE YOURSELF AND JUST GRAB THE SUCCESS. THANKS.
टाळ्यांचा कडकडाट झाला.

देसाई स्टेजवरुन खाली उतरणार इतक्यात एका विद्यार्थ्याने विचारलं ’सर, तो दुसरा सेल्समन
तर मार्केटिंग हेड झाला, यशस्वी झाला. पण पहिल्याच काय झाल? तो आज कुठे असेल?
तो अयशस्वी झाला? त्याच्याविषयी सांगा ना’ देसाईंनी एक क्षण त्या मुलाच्या नजरेला नजर
दिली. मग एक मंद स्मित देत म्हणाले ’ वेल, यंगमॅन, तो पहिला सेल्समन आज तुमच्या
समोर उभा आहे. मीच तो. मला वाटत अधिक स्पष्ट करायची गरज नसावी.’ हॉलमध्ये पुन्हा
एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. देसाई विद्यार्थ्यांना ऑटोग्राफस देत देत मर्सिडिज मध्ये
बसुन परत निघाले.

७ टिप्पण्या:

  1. IF YOU CANT CHANGE THE
    SITUATION, CHANGE YOURSELF AND JUST GRAB THE SUCCESS.

    एकदम सही...

    उत्तर द्याहटवा
  2. शेवट मजेशीर आहे...
    पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय...आपला धंदा चालला नाही की कुण्या तरी मारवाड्याला विकावा आणि आपण मात्र मस्तपैकी गावोगांव हिडून व्याख्यानं देत फिरावं...मराठी माणूस व्यापारात मागे का पडतो?
    हे तुमचे देसाई सरही तसेच म्हणायचे काय? ;)

    उत्तर द्याहटवा
  3. देवकाका,
    ब्लॉगवर स्वागत. देसाईसरांनी परतीच्या प्रवासात पुलं च पुस्तक वाचल असावं :)
    मुल्य स्वीकारुन व्याख्यान देणे हा व्यवसाय नव्हे का?

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम !! शेवटचा पंच खूप आवडला !!

    उत्तर द्याहटवा
  5. हाहाहा!
    शेवट एकदम मस्त झाला! आवडलं.

    उत्तर द्याहटवा
  6. Heramb & The PROPHET

    ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा