ब्लॉगवर आपले स्वागत आहे

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

गरीबाचा वाली कोण?

ऑफिस बिल्डिंगचा वाँचमन कपाळाला सकाळी सकाळी हात लावून बसला होता ..... विचारलं काय झाल बाबा, कोणाशी भांडलास?... त्याने घडलेली घटना सांगायला सुरवात केली..... काल सकाळी पगार घेतला, सगळ्या पाचाशेच्या नोटा.... फॅमिली गावी असते..... वडिल आजारी आहेत..... त्यांच्या अकाउंट मध्ये रुपये पाच हजार भरायला बँकेत गेलो ...... तिथल्या कँशियरने ४५०० फ़क्त जमा करून घेतले आणि एक पाचशेची नोट खोटी आहे म्हणाला..... मी विनंती केली मला नोट परत द्या... माझ्या पगाराचे पैसे आहेत ..... मी साहेबांना नोट परत देतो आणि दूसरी घेतो ..... कँशियर काही ऐकायला तयार होइना .... त्याला मी अनेक प्रकारे विनंती केली की नोट फाडून द्या किंवा नोटेवर काट मारून द्या पण तो तयारच होइना ..... मी साहेबांना पटवून कसा देणार? शेवटी तो मला घेउन मँनेजर कड़े गेला ..... त्या साहेबांची पण मी खुप विनवणी केली .... त्यांनी स्पष्ट सांगितल, तुझ्या साहेबाला घेउन ये इथे ...... नोट मिळणार नाही .... त्या नोटेची एक झेरोक्स देतो ...... झेरोक्स घेउन आलो परत ऑफिसला ..... साहेबांना भेटलो, सांगितल सगळं..... पण साहेब एकेनात..... ते म्हणतात मीच नोट दिली कशावरून? तू बदलली असशील तर? नोट परत घेउन ये, मी बदलून देतो, बैंक नोट फाडून देते परत, तू खोट बोलतोस.... साहेबानी हात झटकले... मी काय करू , माझे पाचशे रुपये गेले हो.... महिनाभर राबुन पगार घेतला, कोण कुठले लोक खोट्या नोटा बनवत असतील, पण मला गरिबाला फोडणी लागली .... वाँचमनने रडायला सुरुवात केली.... मी तरी काय करू शकणार होते . फ़क्त दुखःत सहभागी .......

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

निवडणुकितला रोजगार

काल टिव्ही वर बातम्यात पाहिलं ... प्रचारसभेत, रैलीमध्ये, प्रचार फेरीत सहभाग घेउन घोषणा देण्यासाठी प्रत्येकी रुपये २५० देऊन माणसे भाड्याने आणली जातात.... पैशांबरोबर दोन वेळचा जेवण आणि नाश्ता दिला जातो ..... माणसे भाड्याने पुरावणारे दलाल आहेत ..... पक्ष कोणताही असो , सांगितलेल्या घोषणा देणे इतकच काम..... ह्यावर माणसांना दहा दिवस रोजगार मिळतो म्हणुन समाधान मानाव की आपण कुठच्या पातळीवर जातोय हे पाहून दुखः कराव हेच कळेना.... पूर्वी एका पिक्चर मधे पाहिलं होत, घरात मृत्यु झाल्यावर माणसं बोलवायचे - रडायला, शोक करायला ... हा तसाच प्रकार झाला...... आणि हे चित्र प्रत्येक पक्षात सारखच आहे ... आज आमचाकडे आमचे समर्थक कार्यकर्ते नाहीत... अशी परिस्थिति का निर्माण झाली?

निवडणूकिच्या आधीच फ़क्त जनसंपर्कात रहाण्याची गरज या नेत्याना का वाटते? निवडणूक संपली की ही मंडळी गायब होतात ती परत पाच वर्षानी दिसतात..... निवडून आल्यावर तुम्ही आपापल्या मतदारसंघात काम का करत नाही.... your work will speak..... पाच वर्ष काम करा , तुम्हाला मत मागण्याची पण गरज नाही... तुम्ही नक्की पुन्हा निवडून येणार .... पण एकदा का आम्ही निवडून गेलो की परत मतदारसंघात वळून कोण बघतय? काम करणं तर लांबच राहिलं....

उमेदवार पण असे उभे करतात की ज्यांची नाव पण आधी एकलेली नसतात.... अशा लोकांना निवडून द्यायच? मतदान करताना एकही लायक उमेदवार नाही हे मत नोंदवण्याची सोय आता आमचा हातात असायला हवा... त्याशिवाय ही राजकारणी मंडळी सुधारणार नाहीत आणि काम केल्याशिवाय पुन्हा निवडून येता येणार नाही ह्याच भान ठेवाव लागेल .....

मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

घन तमी शुक्र बघ राज्य करी

काल ग्रन्थ घेउन महिषासुरमर्दिनीचं एक आख्यान वाचत होते .... वाचताना एक उल्लेख आला... घनदाट निबिड़ अशा तम्रतामस नावाच्या अरण्यात अंधाराचे उपासक शुक्राचार्य उपासना करीत असत.... आता शहाण्यासारखं पुढे वाचत राहाव की नाही? पण आमचं मन म्हणजे डूरक्या (वळू मधला ... आठवला?) ... एक जागेवर स्थिर रहाणार नाही.... याला वेसण घालून मुसक्या बांधून कसं ठेवाव तेच कळत नाही ... जाउदे... मी लगेच लागले गाणं शोधायला .... हे शब्द कुठच्या तरी गाण्यात आहेत .... आठवेना ..... मग बऱ्याच वेळाने आठवलं.... घन तमी ... नेट गाठला .... पूर्ण गाण मिळवलं... इथेपण मनाला फटके .... आनंद झाला .... रचना - भा रा ताम्बे, संगीत - हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर - लता मंगेशकर .... पुढे काय बोलावे ......

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

ये बाहेरी अंडे फ़ोडूनी
शुद्ध मोकल्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्ण अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काटयांत बघ कसे
काळया ढगी बघ तेज रसरसे
तीव्र हिमातुनी वसंतही हसे
रे , उघड नयन, कळ पळे दुरी

फुल गळे, फळ गोड झाले
बीज नुरे डौलात तरु डोले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरी - करुणा
आई पाहे वाट रे मना
पसरुनी बाहू कवळण्या उरी

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९

अपराध माझा

काल माझ्याकडून एक मोठी चुक झाली... ज्यासाठी मी स्वतःला कधीच माफ़ करू शकत नाहि... माझ्या सख्या जिवलग मैत्रिणीला माझी गरज असताना मी शक्य असतानाही उपस्थित राहिले नाहि... केवळ व्यर्थ विचारांमुळे... प्रसंगाच गाम्भीर्य ओळखू शकले नाही.... आणि एक चुकिचाच निर्णय घेतला.... याचवेळी चुकीचा निर्णय घेतला की अनेकदा चुकिचेच निर्णय घेतले जातात, कळत नाही... स्वतःच्या निर्णय क्षमतेवरचा विश्वासच उडालाय.... आयुष्यात आतापर्यंत घेतलेले अनेक निर्णय हे आता मागे वळून पहाताना चुकिचेच वाटतात... नेहमी मनात आपण कोणाला दुखवू नये , आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असाच प्रयत्न असतो, पण घडत नेमक उलटचं.... अनावधानानेही चुका का व्हाव्यात ... लक्ष कुठे असतं.... मी कोणाची मैत्रिण होण्याच्या लायक तरी आहे का? .... किंबहुना कोणत्याच नात्याच्या लायक आहे का? विचारांची परिपक्वता कधी येणार? असे अनेक प्रश्न आज मनात थैमान घालताहेत.... कालचा प्रसंग नाहि विसरु शकत कधी आणि ही सल कायम मनात राहिल अगदी मरेपर्यंत...

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

नवरात्रीचे नवरंग

नवरात्र म्हणजे सळसळता उत्सव , घटस्थापना, देवीच्या देवाळातल्या लांबच लांब रांगा, उपवास, वाढीव किंमतीतली फळं, झेंडूच्या फुलांच्या राशी, गरबा आणि दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक ... एकुणच काय तर नऊ दिवस धमाल... याबरोबरच एक नविन समीकरण रुजू पहातयं, नव्हे ते रुजलयं - 'नवरंग - नऊ रंग, घत्स्थापनेच्या तीन-चार दिवस आधिपासुन 'मटा' मध्ये हे नऊ दिवसांचे नऊ रंग छापून येतात... आणि मग घराघरात त्या रंगांप्रमाणे साडया/ड्रेस काढून ठेवले जातात... लेडीज स्पेशल जेव्हा प्लॅटफॉर्म वर तेव्हा ही एकाच रंगाची उधळण पहावी... यात आता पुरुषही मागे राहिलेले नाहीत... त्या त्या दिवशी त्या त्या रंगांचे मिळतेजुळते शर्ट घालून ऑफिसला जातात...
ऑफिस, सोसायटी, महिला मंडळ एकत्र ग्रुप करुन फोटो काढतात आणि काही निवडक फोटो मटा मध्ये छापूनही येतात... परवा एक मैत्रिण भेटली, बोलता बोलता तिने पर्संमधून मटा काढला, म्हणाली ' बघ आमच्या ऑफिस ग्रुपचा फोटो छापून आलाय'... १६ जणींच्या ग्रुप मध्ये मागच्या रांगेत शेवटून तीसरी... खरतर घरी मी फोटोवर नजर मारली होती पण इतक निरखून पहिला नव्हत त्यामुळे ओळ्खू शकले नाही.... पुढे म्हणाली ' मी पण फोटो पाहिला नव्हता, सकाळपासुन दहा फ़ोन आले तुमचा फोटो पेपर मध्ये छापून आलाय ते सांगायला आणि ते दहाही फ़ोन पुरुषांचे होते, एकही बाईचा नव्हता' ... म्हणजे बघा, सकाळी हातात पेपर घेउन बसणारी पुरूषमंडळी काय उद्योग करत असतात ते... फोटोतल्या प्रत्येक बघणं म्हणजे खरचं कमाल आहे पुरुषांची .... एकूण काय 'मटा'ने नटून मिरवण्याची थीम दिली आणि पुरुषांना नेत्रसुख..

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

चारोळी

नमस्कार आजपासून ब्लॉग लिहायला सुरुवात करतेय
स्वानुभव, घटना, आवडलेल्या कविता, किस्से असं काहीबाही लिहायचा मनोदय आहे
आज एक आवडलेली चारोळी लिहितेय (माझी नाही हं ) ......

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत नवी दिशा असावी
घरटयाचे काय, बांधता येइल केव्हाही
क्षितिजा पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी ............