ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

ब्रेकिंग न्यूज

काल रात्री टिव्ही ऑन केला तर जवळ जवळ सगळ्याच चेनेल वर एक ब्रेकिंग न्यूज - ३ तासांत ३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या..... ही बातमी खुपच हायलाईट केली जात होती .... सकाळी पेपर मध्ये पण बारावीच्या २ मुलींच्या आत्महत्येची बातमी ..... ह्या बातमीला अवास्तव रंजित करून दाखवल जातय असा वाटतय..... सध्या परीक्षा जवळ आल्या आहेत ... विद्यार्थी आधीच टेंशन मध्ये आहेत ... अशा बातम्यांच जर वारंवार ह्यामरिंग होत राहिल तर कमकुवत मनाची आणखी मुलं हा मार्ग स्वीकारतील आणि हे प्रमाण अजुन वाढेल ..... मुलांची मनस्थिति आधीच तणावग्रस्त आहे अशा परिस्थितीत सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हायला हावी..... पण अगदी विरुद्ध वातावरणनिर्मिती होत आहे ....
मुलांच्या मनावर परिणाम होईलच पण त्याचबरोबर पालकही मुलाना अभ्यास कर अस निर्धास्तपणे सांगू शकणार नाहीत .... आपल्या बोलण्याचा टेंशन घेउन आपल पाल्य चुकीचा मार्ग तर स्वीकारणार नाही ना ही भीती त्यांच्या मनात सतत राहिल .....
वर्तमानपत्र आणि टिव्ही वर या बातम्यांची प्रसिद्धि थांबवावी अस माझ तरी स्पष्ट मत आहे ......

३ टिप्पण्या:

  1. छान लिहिलस... नाजूक विषय जबाबदारी ने हाताळायला मीडीया कधी शिकणार आहे कुणास ठाउक?

    उत्तर द्याहटवा
  2. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६  जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

    उत्तर द्याहटवा