ब्लॉगवर आपले स्वागत आहे

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

शुक शुक .... कुठे गेला तो?

मिड डे मध्ये आलेल्या बातमीनुसार माननीय छगन भूजबळ यांचा रुपये तीन लाख किमतीचा पोपट त्यांच्या रामटेक या निवासस्थानावरून हरवला आणि तब्बल तीन दिवस मुंबई पोलिस, भुजबळसाहेबांचे सुरक्षारक्षक आणि पक्षकार्यकर्ते अतिमहत्वाच्या 'पोपट शोधमोहिमेत' व्यस्त होते...... शेवटी काल दुपारी २ वाजता हे पोपट महाशय दिलीप वळसे पाटिल यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या नारलाच्या झाडावर बसलेले दिसले..... त्यानंतरही अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ह्या पोपटाला पकडण्यात यश आले....... या सर्व प्रकारात बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, पण त्यातील ३ महत्वाच्या ------ १) पोलिसाना या प्रकारची अतिमहत्वाची कामे असतात २)पोलिस पक्ष्याइतकेच महत्व गुन्हेगार पकड़ण्याच्या कामाला देऊन इतकी चपलता दाखवू शकत नाहीत का? ३) भुजबळसाहेब अमेरिकन जातीचा रुपये ३ लाख किमतीचा पोपट घरी जतन करू शकतात मात्र त्यांच्या राज्यातील जनता कांदे, भाज्या कशा परवडणार याचा विचार करत राहते

८ टिप्पण्या:

 1. नमस्कार साहेब,
  हीच तर आहे खरी शोकांतीका.
  हे तेच भुजबळ, जे राजकारणात येण्याआधि भायखळ्याला भाजीपाला विकायचे, पुढे ते अथक परिश्रमाने इंजिनिअर झालेत.आणी आज बघा ३ लाखाचा पोपट उडवितात. याला काय म्हणाव कळेना.

  उत्तर द्याहटवा
 2. हा पोपट पाळण्यासाठी वनखात्याची परवानगी घेतली दोती काय हा प्रश्र्न अधिक महत्त्वाचा आहे.

  उत्तर द्याहटवा
 3. Namaskar Ramtekekaka,

  jithe Rs20000/- pm salary asnare police inspector 2cr chi property sampadan karu shaktat, tithe 3 lakhacha popat eka politician sathi kahich nahi...

  उत्तर द्याहटवा
 4. एका शुकावर सारीकेने लेखन करावे हा किती इंटरेस्टिंग योगायोग आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. प्रतिक्रेयेसाठी धन्यवाद!
  तुमच्या शुक शुक... पोस्ट साठी दिलेली कॉमेंट तुम्हाला आवडलेली दिसत नाहीये.

  उत्तर द्याहटवा
 6. Shabdankit....

  Thanks... sorry pratikriya niyantrit karayla ushir zala..... pratikriya aavdli...

  उत्तर द्याहटवा