ब्लॉगवर आपले स्वागत आहे

बुधवार, १७ मार्च, २०१०

श्री स्वामी समर्थ

काल श्री स्वामी समर्थ जयंती ... त्या निमित्ताने मठात जायचे होते .... सकाळी ऑफिसला जाण्याआधी काही कारणाने जायला मिळाले नाही... मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर जाऊ अस ठरवल ..... अंधेरी लोखंडवाला येथे स्वामींचा मठ आहे .... चार वर्षांपूर्वी माझ ऑफिस अंधेरी वेस्टला शिफ्ट झाल ... पण जायचा योग आला नव्हता ... काही झाल तरी आज नक्की जायच अस ठरवल .....
माझे बॉस(वय वर्षे ६५, मारवाड़ी) या मठाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रहातात ... साधारण ४ च्या सुमारास मी त्यांना म्हटल ' मला तुमच्या घरासमोरच्या मंदिरात जायचे आहे .... तेव्हा संध्याकाळी तिथे मला सोडा' तर 'हो' म्हणाले .... आमच्यात पुढे झालेला संवाद -
मी: गर्दी असेल ना ?
बॉस: गर्दी? वहाँ क्या है? कोई जाता है?
मी: हाँ, वहाँ मंदिर है।
बॉस(कुत्सितपणे): यूपीवाले बाबा की न्यूज सुनी थी कल
माझ डोक सटकल
मी: उस न्यूज से इसका क्या रिलेशन ? व्हाटस दी पॉइंट ऑफ़ कमप्यारीजन?
बॉस गप्प ...
मी: व्हाय यू गो टू शिर्डी सो ऑफ़न ?
या प्रश्नावर उत्तर नाही? राग आला असावा... समोरून निघून गेले... ही मंडळी दर ४/६ महिन्यांनी शिर्डीला जातात... यांच्या मनात भाव / श्रद्धा किती मला खरच माहित नाही ..... 'साईंसत्चरित' नावाचा 'हेमाडपंतांनि लिहिलेला ग्रन्थ आहे हे यांना माहिती नाही .... म्हाळसापति, हेमाडपंत, चांदोरकर कोण हे यांच्या गावीही नसावे ... असो .... 'जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव'... शिर्डी प्रसिद्धि झोतात आहे म्हणून माहीत असेल आणि जात असावेत .... काहीही असो .... पण जर दुसर्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल माहिती नसेल तर उगाच कोणतीही कमेन्ट करू नये अथवा तिरस्कार व्यक्त करू नये असे माझे स्पष्ट मत आहे ...
मला खुपच राग आला होता .... ऑफिस सुटल्यावर बॉसच तोंडही न पाहता निघाले.... रिक्शा केली आणि सरळ मठात पोचले ....४ वर्षानंतर आले .... स्वामींची इच्छा ..... हा मठ खुप प्रशस्त आणि सुन्दर आहे .... गर्दी होती आणि रांग लावून स्वामींच दर्शन घेतल .... गाभार्यात खुपच सुगंध, प्रसन्नता आणि स्पंदन जाणवली ... नंतर शांतपणे बसून प्रसाद घेउन निघाले .... मन शांत झाल ..... ।। श्री स्वामी समर्थ ।।

११ टिप्पण्या:

 1. आम्हीही महिन्यातून एकदा या मठात येतो. परवाचं पाडव्याला सकाळी येऊन गेलो....कारण काल जाम गर्दी असेल हे माहीत होतं आणि नवर्‍याला रजाही नव्हती.

  उत्तर द्याहटवा
 2. वा वा,

  स्वामींचे दर्शन घडले हे चांगले झाले.

  आता तरी समजले असेल स्वामीजयंती परवाच होती, २७ ला नाही.

  आपला,
  (खवचट) धोंडोपंत

  उत्तर द्याहटवा
 3. Pant... Namaskar

  Swaminche darshan agdi chhan ghadle, man agdi prasanna ani shant jhale. Jya calendar madhye swami jayanti 27 la aahe te calendar dakhven ekda....

  उत्तर द्याहटवा
 4. ! Shreee Swami Samarth ! ha ekach mantra sarva kashtatun, prasangatun, dukkhatun aaplyala tarat asato. Fakt shraddha havi. Jivanat anek kathin prasang aale tari aaple swami aplya pathishi aahe hi ek gosta manashi balaga. Swami tumhich mazhe.

  उत्तर द्याहटवा
 5. ॥ ॐ ॥

  "ओळख तो आवाज़,

  ओळख ती खुण,

  आपल्या भकतांसाठी तो फिरतो आहे अज़ून,

  त्याला उगम नव्हता; त्याला अंत नाही,

  तो त्रैलोक्याचा स्वामी नूसताच संत नाही,

  त्याच स्मरण कर देहभान विसरून,

  तो हळुवार येइल, अन कानात जाईन सांगून",

  "भीउ नकोस मी तूझ्या पाठीशी आहे".

  ।। श्री स्वामी समर्थ ।।

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. महाराज श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

   हटवा
 6. shri swami samarth!
  swami kon aahet ha kityek lokanla prashn padto,specially je swaminla manat nahit. Tya sarvanla me hech sangel ki swami mhanje parbramha, swami mhanje parmatma,swami sarv kahi aahet. swami tyanchya bhakatansathi tyanchi aai,vadil,bhau,bahin,mitra ase sarv kahi aahet.
  swaminsarkhe guru milne dekhil ek khup motha bhagyach aahe.
  mazyasathi swamich sarv kahi aahet.tyanni mala nehmi madat keli ,eka aaisarkhe nehmi mazya pathishi ubhe astat.
  tyancha khup mottha aadhar aasto manala.

  mhananuch "JYANCHA GURU SWAMI TAYA YA JAGI BHITI NAHI"
  $ SHRI SWAMI SAMARTH $

  उत्तर द्याहटवा
 7. Kontehi kam hati ghetle ki manat bhiti vatayachi hoile ki nahi pan te kam karayala jat astana road varun jata jata kuthetri swami maharajanche photo disayche kinva samorun ekhadi gadi jaychi ani pathimage shri swami samarth lihilele disayche ki bhiu nakosh mi tujya patishi aahe aani te vakya vachun purna khatri aasayachi ki kam honar aani kam vhayche.ashyaprakare swami maharaj veloveli marg dakhvtat.aani manatil bhiti dur kartat. aajhi kontyahi kamachi survat shri swami samarth mantrane keli ki kamachi aapoaap prachiti yete

  उत्तर द्याहटवा