ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

वाढते व.....

लहानपणी ’काय बाई सांगु, कसं गं सांगु, मलाच माझी वाटे लाज, वजनाचा काटा मोडला आज’ हे गाण गाउन जाड्या लोकांची जाम टर उडवायचो आम्ही. खुप हसायचो. तेव्हा गम्मत वाटायची, पण आता...... हल्ली वजन जरा अंमळ जास्तच वाढलय. जास्त म्हणजे दिवसातुन एकदा तरी वजन वाढतय कमी करा अशी कमेंट ऎकायला मिळ्ते आणि ते कमी करण्य़ासाठी उपायही सुचवले जातात. उपाय अनेक उदा.
१) दुधीभोपळ्याचा रस अथवा पावडर खा २) जीम जॉईन करा ३) हाय कॅलरी फुड बंद करा ४) अमुक गोळ्या सुरु करा ५) अमुक डायटिशन कडे जा ६) फक्त फळ, सुप आणि सॅलेड खा, इतर जेवण बंद करा ७) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध आणि लिंबु घालुन प्या ८) माझे सगळे आवडते पदार्थ (पावभाजी, वडापाव, पिझ्झा, चॉकलेट, आइसक्रिम, समोसा, वेफर आणि बरेच..) ज्यांची गणना जंक फुड मध्ये होते ते बंद करणे. ९) दिवसभर गरम पाणी पित राहणे. असे आणि असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

हे सगळ ऎकुन त्रस्त झालेय मी आणि वजन कमी करायचा निर्णय घेतलाय. अर्थात लोकांच्या कमेंट्स हे एकमेव कारण नाहि तर हल्ली चालण्याचा वेग जरा मंदावल्यासारखा वाटतोय आणि वजन अजुन प्रमाणाबाहेर वाढले तर कमी करणे कठीण जाईल असे वाटतय. तर ... एकुण ८ किलो वजन कमी करण्याचा मानस आहे. इतक वजन कमी करायला किमान एक वर्ष तरी लागेल अस अनुभवी लोकांच मत आहे. त्यासाठी काही झेपतील(?) असे अत्याचार स्वत:वर करणार आहे - १) रोज १ तास (किमान अर्धा तास) चालणे (नेमकं कधी हा मोठा प्रश्न आहे ) २) भात(खुप कठिण आहे), बटाटा आणि साखर बंद करणे ३) रोज ३ लिटर (खुप होतं हे) पाणी पिणे ४) सो कॉल्ड ’जंक’ फुड बंद (जुलुम) ५) रात्री जमल्यास न जेवता फक्त सुप आणि फळांवर राहणे (हा पर्याय मी लास्टला ठेवलाय)
हे सगळं काल ठरवल आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे निद्रादेवीचा विजय झाला आणि चालायला जायचं राहिलं. सकाळपासुन ३ चहा झाले त्यात एक बिनसाखरेचा होता. दुपारी डबा खाताना कोणाच्या तरी डब्यातुन आलेला ’पालक पनीर आणि आलुफ्राय’ खाल्ल (नाहि म्हटल तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणुन). पाणी फक्त दोन ग्लास प्यायल गेलाय. आणि ऑफिस मध्ये एकाचा वाढदिवस आहे तर आइसक्रिम मागवलय. असो आज जरी माझ्या वेट कंट्रोल प्लानचे बारा वाजले असले तरी मी अजुन हार मानली नाहीये. हे मिशन पार पाडायचेच आहे.

१६ टिप्पण्या:

  1. सारिका,
    हा हा हा
    तु एकटी नाहीस, तुझ्या माझ्यासारखे अनेक या दुष्ट चक्रात अडकलेत. रोज रात्री मी ’उद्यापसुन डाएट नक्की’ असे ठरवते आणि सकाळी सकाली विसरुन जाते :)

    उत्तर द्याहटवा
  2. सोनालीताई, वोह सुबह कभी तो आयेगी....... :)

    उत्तर द्याहटवा
  3. अरे वा.. बरेच लोकं आहेत की माझ्या सारखे :)
    प्रयत्नांती परमेश्वर..

    उत्तर द्याहटवा
  4. Same pinch... :)
    Majhe sudha asech hotey..... Lets hope so " woh subhah kabhi to aayegi..." :)

    उत्तर द्याहटवा
  5. वजन कमी करण्यासाठी भात सोडायला लागत असेल, तर आम्ही वजन कमी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. कोकणी माणूस आणि भात सोडता? आमच्याकडे तर पुढचा भात आणि मागचा भात असतो. असो.

    आम्ही देखील वजन कमी करण्याच्या नादी लागलो आहोत.पण रोज चालणे होत नाही. त्या दिवशी आमचे गुरू साठ्ये शिवाजीपार्कात भेटले. म्हटलं, आजचा दुसरा दिवस आहे. एकही दांडी न मारता सलग दोन दिवस चाललोय. :)

    तुमच्या या उपक्रमातील टप्पे आम्हाला कळवा. आमचेही वजन त्या प्रोत्साहनाने कमी होईल. तसे फार नाहीये. पण जेवढे पाहिजे त्यापेक्षा फक्त ६ किलो जास्त आहे.

    शुभेच्छा

    धोंडोपंत

    उत्तर द्याहटवा
  6. लगे रहो, आशेवर दुनिया टिकुन आहे.... हे..हे...

    उत्तर द्याहटवा
  7. पंत,

    भात सोडणं खुपच कठीण. फक्त रविवारी भात खायचा या सबबीखाली काल यथेच्छ भात ओरपलाय.... :)

    उत्तर द्याहटवा
  8. आनंदजी,

    धन्यवाद. हम होंगे कामयाब... एकदिन.... :)

    उत्तर द्याहटवा
  9. मला 'जी' वगैरे नको, सरळ आनंद चालेल... "जी" वगैरे बिस्कीटांना लावतात ;-)

    उत्तर द्याहटवा
  10. अगदीच नाजूक विषयावर लिहाल आहेत. या वजनासारख्या गोष्टीचा विचार करणेच सोडून दिलेय. खूप विचार केला तर खूप गोष्टीना आपण मुकतो.
    उदा. भात, उशिरापर्यत झोपणे,आणि बऱ्याच......
    (काही लोक या गोष्ठी वरून बोल लावतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं)

    ये सब मैने अब उपरवाले के भरोसे छोड दिया है.

    उत्तर द्याहटवा
  11. कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है...

    उत्तर द्याहटवा
  12. वजन कमी करण्यासाठी एरोबिक्ससारख्या व्यायामानी उभे रहाणे व चालणे या दोन्हीची पद्धत सुधारण्याचा उपयोग होतो.

    उत्तर द्याहटवा
  13. अनामित,

    एरोबिक्स अजुन ट्राय केले नाही. धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा