ब्लॉगवर आपले स्वागत आहे

सोमवार, १५ मार्च, २०१०

नैराश्य

माहित नाही का पण गेल्या काही दिवसांपासून खुप नैराश्य आणि फ्रस्ट्रेशन आलय ...... काहीच करावस वाटत नाही .....ऑफिस मध्ये पण कामात लक्ष लागत नाहिये.... कोणताच काम धड होत नाहिये ...... मन फार विचित्र झालय..... कसलाही उत्साह नाही .... कसलाही आनंद नाही ...... अगदी टिव्ही पहवासाही वाटत नाहीये ..... वाचन करावास वाटत नाहिये... बोलावस वाटत नाहीये ........ खुप बैचेनी आणि उदासीनता आलिय ...... कधी आणि कशी यातून बाहेर पडेन माहीत नाही ...... मन मनास उमगत नाही .... मज तुझी .................

७ टिप्पण्या:

  1. एक फुकटचा सल्ला देतो. . .माझी हो पोस्ट वाचा तुम्ही.

    http://manmaujee.blogspot.com/2010/03/blog-post_13.html

    एक दिवस अगदी मनसोक्त जगा. . .जे मनाला आवडेल तेच करा. . .नैराश्य नक्की जाईन!!!

    उत्तर द्याहटवा
  2. ग्रेसची फार सुंदर कविता आहे,

    मन कशात लागत नाही
    अदमास कशाचा घ्यावा?
    अज्ञात झर्‍यावर रात्री
    मज ऐकू येतो पावा....

    श्वासांचे तोडुन बंधन
    हे हृदय फुलांचे होई
    शिशिरात कसे झाडांचे
    मग वैभव निघून जाई....

    सळसळते पिंपळपान
    वार्‍यात भुताची गाणी
    भिंतीवर नक्षत्रांचे
    आभाळ खचविले कोणी?

    मन कशात लागत नाही...

    मन बहरगुणांचे लोभी
    समईवर पदर कशाला?
    हे गीत तडकले जेथे
    तो एकच दगड उशाला

    चल जाऊ दूर कुठेही
    हातात जरा दे हात
    भर रस्त्यामध्ये माझा
    होणार कधीतरी घात....

    मन कशात लागत नाही..

    आपला,
    (खिन्न) धोंडोपंत

    उत्तर द्याहटवा
  3. संदीप खरे च्या कविता ऐका खूप बर वाटेल...........

    उत्तर द्याहटवा
  4. संदीप खरे च्या कविता ऐका खूप बर वाटेल...........

    उत्तर द्याहटवा