ब्लॉगवर आपले स्वागत आहे

मंगळवार, १६ मार्च, २०१०

पाचशेची नोट

काल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे रिक्षाची वाट पाहत थांबले... वीरा देसाई रोडवरून अंधेरी स्टेशनसाठी रिक्शा मिळन कठीण झालय.... त्यात हल्ली मेट्रोच काम सुरु असल्यामुले स्टेशन ला पोचायला खुप वेळ लागतो आणि रिक्शा यायला तयारही होत नाही ...... अजुन दोन बायका रिक्शासाठी उभ्या होत्या.... एक रिक्शा आली.... त्या दोघिनी विचारल 'नवरंग'? ... तो नाही म्हणाला... मग मी स्टेशन विचारल तर हो म्हणाला ..... चला रिक्शा मिळाली..... आत बसले .... तेवढ्यात एक बाई आली..... साधारण चाळीशिची असेल ..... म्हणाली मलापण स्टेशन ला जायचय ... क्यान आय ज्वाइन?... बाई एकदम हायफाय.... तसाही रिक्शा मिलन प्रोब्लेम असतो , म्हटल ओके .... ती पण बसली .... रिक्शा निघाली ..... मग रस्त्यात मी कुठे जॉब करते, कुठे राहते वगैरे चौकशी तिने माझी केली .... आणि स्वतः ठाण्याला राहते म्हणाली.... मग म्हणाली .... ५०० रु सुट्टे आहेत का ? माझ्याकडे होते पण मी नाही म्हणाले .... न जाणो नोट खोटी असली तर आपल्याला फटका बसायचा ......मग जस स्टेशन जवळ आल तस तिने रिक्शावाल्याला विचारल आपके पास ५०० का छुट्टा है ?..... तोही नाही म्हणाला .... मग मला म्हणते आता मी पैसे कसे देऊ ? मी म्हटल ओके ... मी दिले रिक्षाचे २६रु .... ह्या बाईने सुट्टे १,२ किंवा जे काही सुट्टे असतील ते बघायला / काढायला पर्स ओपनही केली नाही ..... ही फ़क्त ५०० रु नोट घेउनच फिरत असेल का ? मी ओके म्हटल्यावर ही बाई साध थ्यांकयु ही न म्हणता उतरून चालु पडली .... म्हटल जाऊदे ... बहुतेक हिची नोट पण खोटी असावी माझे ५०० रु वाचले किंवा मग हिला अशी फुकट स्टेशन ला जायची सवय असावी .... असो माझा फायदा काही नाही झाला पण नुकसान नाही झाले हे काय कमी आहे ?

७ टिप्पण्या:

  1. आपण तिला ५०० रु. सुटे न देवून व रिक्षाचे भाडे देऊन हे दोन्ही केल्याने पुण्य कमावले... ऐसे आमचे प्रांजळ मत

    उत्तर द्याहटवा
  2. Dhanyavad. Punyacha mahit nahi pan mala pachshechi fodni nahi lagli asa nakki vatatay

    उत्तर द्याहटवा
  3. त्याच जागी एखादी नऊवारीतली ग्रामीण स्त्री असती तर काय केले असतेत? तिकडूनही ५०० ची फोडणी लागू शकते...

    खरा विवेक विचार हवा...

    उत्तर द्याहटवा
  4. nauvaritil gramin stri asti tari tech kele aste je ya case madhye kele. kharya garjuna madat kadachit hou shaknar nahi.

    उत्तर द्याहटवा
  5. अगदी योग्य... (अगदी विंदांच्याच शब्दात सांगायचे झाले तर... माझ्या मना बन दगड...) आणि कौतुकास्पद असेच...

    उत्तर द्याहटवा
  6. अगदी अशिच कल्पना एका हिंदी सिनेमात पण पाहिली होती.मला वाटतं त्यामधे अक्षय कुमार होता..

    उत्तर द्याहटवा